अहिल्यानगर २९ ऑगस्ट २०२६
अहिल्यानगर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक 27/08/2026 रोजी सोनई व बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध पानमसाला (गुटखा), मावा व सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांविरुद्ध व्यापक कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख श्री. संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथक स्थापन करून पथकांनी पाच विविध ठिकाणी छापे टाकून एकुण रु. 89,366 किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय
सदर कारवाईमध्ये सहभाग असलेले पोलिस अधिकारी व अंमलदारांमध्ये निळकंठ कारखेले, अतुल लोटके, विकास साळवे, सतीष भवर, गणेश लोंढे, रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ, रणजीत जाधव, शामसुंदर जाधव, प्रताव देवकाते, मनोज साखरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे व अमोल कोतकर यांचा समावेश होता. या छापेमारीत एकूण 8 आरोपींबद्दल 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालांच्या तपशीलानुसार सोनई पोलीस ठाण्यात गुन्हे क्र. 375/2026 व 376/2026 या अंतर्गत शब्बीर महेताब सय्यद (वय 45) व जावेद उस्मान शेख (वय 52) यांच्या विरोधात पानमसाला व तंबाखू मुद्देमाल जप्त करण्यात आला; तसेच बेलवंडी हद्दीत गुन्हे 320/2026, 321/2026 व 322/2026 नोंदवण्यात आले आहेत.
यापैकी काही आरोपी फरार असून त्यांचा त्वरित शोध घेतला जात आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाईची माहिती देत म्हटले की अवैध तंबाखू विक्रीवर नियंत्रण आणणे व सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण हे प्राथमिक उद्देश आहे. स्थानिक प्रशासनाने तसेच नागरिकांनी तक्रारी आल्यास स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
