जामखेड प्रतिनिधी/२६सप्टेंबर २०२६
जामखेड शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात एका २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
घटनेची सविस्तर अशी की,
मयत तरुणाचे नाव: अनिकेत बेंजामिन निमगावकर (वय २९, मूळ रा. जे.पी. हाइट्स, मुनुरवार हाऊसिंग सोसायटी, वडगाव शेरी, पुणे)
घटनास्थळ: म्हाडा कॉलनी परिसर, जामखेड
कालावधी: २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान.
जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ६८/२०२६ (भा.ना.सु.सं. २०२३ चे कलम १९४ अन्वये) नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी सुरेश भास्कर निमगावकर (वय ७३, रा. कोल्हेमळा, जामखेड) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात खबर दिली. माहिती मिळताच सहायक फौजदार शिवाजी कदम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शिवाजी कदम या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.
