जामखेड प्रतिनिधी १ऑक्टोबर २०२६
पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने श्री. संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार विजय पवार, रमीरराजा आत्तार, अजिनाथ पाखरे, अभिजीत अरकल, अमोल कोतकर, मनोज साखरे, बाळासाहेब नागरगोजे, निळकंठ कारखेले, सतीष भवर, शाहीद शेख, संदिप पवार, विजय ठोंबरे, संतोष खैरे, सागर ससाणे, रोहित येमुल, अशोक लिपणे, किशोर शिरसाठ, अरूण गांगुर्डे, रोहित मिसाळ, दिपक जाधव, विष्णु भागवत, अमोल आजबे व प्रकाश मांडगे अशांचे सात पथके तयार करून जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 30/09/2026 रोजी पथकाने राहुरी, श्रीगोंदा, नेवासा, नगर तालुका, तोफखाना, सोनई, शनिशिंगणापूर, जामखेड, पारनेर व सुपा पोलीस स्टेशन हद्दीत दारू व जुगार चालणाऱ्या ठिकाणांची माहिती काढुन 40 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालील पोलीस स्टेशनला दारूबंदीचे 20 गुन्हयांत 1,67,960/- रू व जुगाराचे 20 गुन्हयांत 41,439/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस स्टेशननिहाय कारवाईचा तपशील:
1. राहुरी: दारूबंदी १ गुन्हा (जप्त मुद्देमाल २,०८०/- रु.), जुगार ६ गुन्हे (जप्त मुद्देमाल ९,५९०/- रु.)
2. श्रीगोंदा: दारूबंदी ५ गुन्हे (जप्त मुद्देमाल ४८,७१५/- रु.), जुगार ० गुन्हा
3. नेवासा: दारूबंदी २ गुन्हे (जप्त मुद्देमाल ३,०४०/- रु.), जुगार ३ गुन्हे (जप्त मुद्देमाल ४,६३०/- रु.)
4. नगर तालुका: दारूबंदी ३ गुन्हे (जप्त मुद्देमाल ३५,८४५/- रु.), जुगार ० गुन्हा
5. तोफखाना: दारूबंदी २ गुन्हे (जप्त मुद्देमाल ६०,९००/- रु.), जुगार ० गुन्हा
6. सोनई: दारूबंदी १ गुन्हा (जप्त मुद्देमाल ३,५००/- रु.), जुगार २ गुन्हे (जप्त मुद्देमाल २,४९०/- रु.)
7. शिंगणापूर: दारूबंदी १ गुन्हा (जप्त मुद्देमाल ३,०००/- रु.), जुगार १ गुन्हा (जप्त मुद्देमाल १,४४०/- रु.)
8. जामखेड:दारूबंदी २ गुन्हे (जप्त मुद्देमाल २,४००/- रु.), जुगार ५ गुन्हे (जप्त मुद्देमाल २०,४४९/- रु.)
9. पारनेर: दारूबंदी २ गुन्हे (जप्त मुद्देमाल ७,५२०/- रु.), जुगार २ गुन्हे (जप्त मुद्देमाल १,८७०/- रु.)
10. सुपा: दारूबंदी १ गुन्हा (जप्त मुद्देमाल ९६०/- रु.), जुगार १ गुन्हा (जप्त मुद्देमाल ९७०/- रु.)
• एकूण कारवाई: दारूबंदी २० गुन्हे (एकूण जप्त मुद्देमाल १,६७,९६०/- रु.), जुगार २० गुन्हे (एकूण जप्त मुद्देमाल ४१,४३९/- रु.)
गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस अंमलदार: विजय पवार, रमीरराजा आत्तार, अजिनाथ पाखरे, अभिजीत अरकल, अमोल कोतकर, मनोज साखरे, बाळासाहेब नागरगोजे, निळकंठ कारखेले, सतीष भवर, शाहीद शेख, संदिप पवार, विजय ठोंबरे, संतोष खैरे, सागर ससाणे, रोहित येमुल, अशोक लिपणे, किशोर शिरसाठ, अरूण गांगुर्डे, रोहित मिसाळ, दिपक जाधव, विष्णु भागवत, अमोल आजबे, प्रकाश मांडगे.
वरील कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे
