जामखेड (विशेष प्रतिनिधी):७ ऑक्टोबर २०२६
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीविरुद्ध जिल्ह्यात दिनांक ६ ऑक्टोबर व ७ ऑक्टोबर रोज़ी धडक मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत जामखेड शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण १,४१,५१६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून दोन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली.
जामखेड परिसरातील कारवाईचा सविस्तर तपशील:
१) भवरवाडी (जामखेड) कारवाई:
दाखल गुन्हा: जामखेड पो.स्टे. गु.र.नं. ६८३/२०२६ (BNS १२३, २२३, २७४, २७५)
जप्त मुद्देमाल: ₹२८,३४०/- किमतीचा गुटखा व तंबाखू साठा
कारवाईतील आरोपी: अर्जुन गहिनीनाथ सोनटक्के (रा. भवरवाडी, ता. जामखेड)
२) पोकळेवस्ती (जामखेड) कारवाई:
दाखल गुन्हा: जामखेड पो.स्टे. गु.र.नं. ६८४/२०२६ (BNS १२३, २२३, २७४, २७५, ३(५))
जप्त मुद्देमाल: ₹१,१३,१७६/- किमतीचा अवैध मुद्देमाल
कारवाईतील आरोपी: श्वेत शिवाजी वीर (रा. पोकळेवस्ती, जामखेड)
फरार आरोपी: आशुतोष शामराव रहाणे (रा. शिर्डी) व किरण बोराडे (रा. पाथरूड, ता. भूम, जि. धाराशिव)
जामखेड तालुका व शहरात अशाप्रकारे अवैध गुटखा व तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांची कडक नजर राहणार असून कठोर कारवाई केली जाईल.
