पाथर्डी (अहिल्यानगर):५सेंप्टेंबर २०२६
सन २०२० मधील आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर गुन्ह्यात तब्बल ६ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात पाथर्डी पोलिसांना मोठे यश आले आहे. भगवान चंद्रभान निर्मळ (वय ४२, रा. लखमापूरी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण?
२२ डिसेंबर २०१९ रोजी भागवत गणपत चाचर (वय ५०, रा. सोनोशी, ता. पाथर्डी) यांनी काही लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून ०६ जानेवारी २०२० रोजी पाथर्डी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी भगवान निर्मळ हा फरार झाला होता आणि पोलिसांना सापडत नव्हता.
पोलीस अधीक्षक श्मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशाने पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. आनंद कोकरे यांनी पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, आरोपी भगवान निर्मळ हा लखमापूरी गावात आला असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोका अक्षय वडते आणि दक्षिण मोबाईल सेल अहिल्यानगर येथील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक मदतीद्वारे शोधमोहीम राबवली. लखमापूरी शिवारात त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पाथर्डी पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लुबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु (शेवगाव विभाग) आणि पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोका/७७७ अक्षय वडते (पाथर्डी पो.स्टे.) तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोका/६४८ अरुण सांगळे आणि पोका/२५५६ राहुल गुंडू यांच्या पथकाने केली.
