जामखेड प्रतिनिधी/२६ ऑगस्ट २०२६
जामखेड तालुक्यात दिनांक 21/08/2026 रात्री सुमारे 09:00 व ते 22/08/2026 पहाटे 04:30 या दरम्यान नवीन कोर्टसमोर, म्हाडा कॉलनी येथील सविता चंद्रकांत घोडके (वय 42, व्यवसाय: मजुरी) यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना जामखेड तालुक्यात घडली आहे.
चौकशीतून समोर आले की घरातील रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने आणि सॅमसंग कंपनीचा LED टीव्ही असा एकूण ₹73,500 किमतीचा माल चोरट्यांनी गायब केलं आहे.
फिर्यादीने जामखेड पोलीस स्टेशनला (गु.र.नं. 580/2026) भारतीय दंड संहितेच्या कलम 305(a), 331(4) अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सफौ/कदम करीत आहेत.
