जामखेड प्रतिनिधी/8ऑगस्ट2026
अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरे कत्तल करणारे व त्यांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळवून कारवाई करण्यासाठी पथके रवाना केली होती.
स्थानीक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनि. कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखिले, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, बाळासाहेब गुंजाळ व महिला पोलीस अंमलदार किरण ठुबे यांचा पथक तपास कार्यान्वित करत होता.दिनांक 07/08/2026 रोजी जामखेड पोलीस स्टेशनला प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे तपास पथक मोहम्मदीया मस्जिदजवळील पत्र्याच्या शेडमध्ये पंचासमक्ष पाहणीसाठी दाखल झाले. तिथे सकलेन कदीर कुरेशी (वय 24, रा. कुरेशी मोहल्ला, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) या व्यक्तीने पत्र्याच्या शेडमध्ये तीन गोवंशीय जनावरे बांधून ठेवलेली असल्याचे आढळले.
पोलीस ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून चौकशी केल्यानंतर आरोपीने ती जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवली असल्याचे कबूल केले. ताब्यातील जनावरांची व इतर वस्तूंची एकूण किंमत रु. 80,000/- (रु. 60,000/- किं. 2 गायी व रु. 20,000/- किं. 1 वासरू) अशी नोंद झाली असून ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.सदर प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन क्रमांक गु.र.नं. 531/2026 नुसार महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम, 1995 (सुधारित 2015) कलम 5(ब), 9 आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविणे संदर्भातील कलम 3 व 11 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.वरील कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनानुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक व पोलीस अंमलदारांनी केली आहे.
