अहिल्यानगर २५ऑगस्ट २०२६
अहिल्यानगर — दिनांक 18/08/2026 रोजी कोपरगाव येथील श्री. निलेश भारत चावरे यांची अल्पवयीन मुलगी (वय 12) अज्ञात इसमांनी पळवून नेल्याची तक्रार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनवर (गुन्हा नं. गुरनं 464/2026) बीएनएस कलम 137(2) अंतर्गत नोंद करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम गठीत करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करण्यात आला. पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, अशोक लिपणे, आजिनाथ पाखरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, अभिजीत आरकल, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे व किरण ठुबे यांचे पथक तपासावर काम करत होते.
गोपनीय माहिती आणि तांत्रिक चौकशीनुसार दिनांक 21/08/2026 रोजी पिडीत मुलगी इसम नामे नूर राजू पठाण (वय 19, रा. आंबेडकरनगर, राहाता) यांच्याकडे हरीमळा, दरेवाडी, सोलापूर रोड येथील ठिकाणी असल्याचे कळाले. पथकाने तातडीने त्या ठिकाणी छापा टाकून पिडीत मुलगी व नूर राजू पठाण यांना ताब्यात घेतले.
तपासात समोर आले की, पिडीत मुलगी कोपरगाव येथून अहिल्यानगर येथे पळवून आणली गेली होती व त्यात समीर मनोज सोनगत (वय 22, रा. हरीमळा, दरेवाडी) त्यांना मदत करीत होता. म्हणून समीर मनोज सोनगत यासही ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपी व पिडीत मुलगी पुढील तपासाकरिता कोपरगाव शहर पोलीस स्टेशनवर हजर करण्यात आले आहेत.
ही कारवाई . मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व पोलीस दलाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
