जामखेड प्रतिनिधी/13ऑगस्ट 2026
अहिल्यानगर जिल्ह्यातील गंभीर गुन्हे व सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी मा. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार दिनांक 12/08/2026 रोजी रात्री जिल्ह्याभरातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोम्बींग ऑपरेशन राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे श्री संतोष मुटकुळे यांनी पोउपनि/अनंत सालगुडे, पोलीस श्री रोहित मिसाळ, मनोज साखरे, प्रताप देवकाते, अमोल कोतकर व जालिंदर साखरे यांच्या पथकास मार्गदर्शन करून कोम्बींग ऑपरेशनसाठी रवाना केले.
दिनांक 13/08/2026 रोजी नमूद पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत ऑपरेशन करत असताना गोपनीय माहितीवरून हद्दपार आरोपी सागर बाळू लोखंडे (वय 26, रा. आरोळेवस्ती, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) हा जामखेड ते श्रीगोंदा रस्ता, हॉटेल गंगाई जवळ आढळला. पथकाने पंचासमक्ष तपास करून त्यास ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्यावर आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून रु. 51,000/- रोख तसेच एक गावठी पिस्तूल, एक मॅगझीन व एका जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.
अधिक चौकशीत आरोपीने सांगितले की हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस त्याच्या परिचित गणेश दादासाहेब भवर (रा. कळसपिंप्री, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर — सद्यस्थितीत फरार) यांच्याकडून विक्रीसाठी आणला आहे.
तपासात असे आढळले की सागर लोखंडे हा आधीच हद्दपार नोंद असलेला आरोपी आहे व त्याचा हद्दपार कालावधी अद्याप संपलेला नाही.
सदर आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं.553/2026 अंतर्गत आर्म्स ऍक्ट कलम 3/25, 7 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वरील कारवाई मा. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांद्वारे पार पडली आहे.
