जामखेड (प्रतिनिधी): ६ सप्टेंबर २०२६
समता ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आणि जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक सभापती प्रा.राम शिंदे यांचे निकटवर्तीय संतोष (भाऊ) गव्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त, जामखेड येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये एका विशेष मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर गुरुवार, दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चालणार आहे.
या शिबिरात हृदयाशी संबंधित आजारांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. यामध्ये खालील तपासण्या आणि उपचार पूर्णपणे मोफत केले जातील:
अँजिओग्राफी (Angiography)
अँजिओप्लास्टी (Angioplasty)
हृदयाची सोनोग्राफी (2D Echo)
ECG तपासणी
याव्यतिरिक्त, हाडांचे सर्व प्रकारचे ऑपरेशन्स आणि इतर उपचार देखील या शिबिरात विनामूल्य केले जातील.
या शिबिराचा लाभ घेण्यासाटी, रुग्णांकडे आयुष्यमान भारत कार्ड असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी, इच्छुक व्यक्ती जामखेड येथील बस स्टँड शेजारील स्पंदन हॉस्पिटलमध्ये संपर्क साधू शकतात.
अधक्ष संतोष भाऊ गव्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त, या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जामखेड आणि परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
