जामखेड :11 सप्टेंबर 2026
सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते व जामखेड नगरपरिषदेचे नगरसेव अधक्ष संतोष गव्हाळे यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. खर्डा लगत असणाऱ्या भूम तालुक्यातील नळी वडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ वृद्धाश्रमात त्यांनी वृद्धांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.
यावेळी अध्यक्ष संतोष गव्हाळे यांच्या समवेत पत्रकार श्वेता गायकवाड, साळुंखे व संतोष गव्हाळे यांचा मित्रपरिवार समता ग्रुपचे सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी अन्नदान करण्यात आले. केवळ वाढदिवस साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान करण्याचा उपक्रम राबविल्याने उपस्थितांनी संतोष भाऊ गव्हाळे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत काही वेळ आनंदाने घालवत त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाची जामखेड तालुक्यात चर्चा होत आहे.
यावेळी बोलताना संतोष भाऊ गव्हाळे यांनी सांगितले की, “माझा वाढदिवस दरवर्षी नळी वडगाव येथील वृद्धाश्रमात येऊन अशाच पद्धतीने साजरा करणार असून, वृद्धांचा आशीर्वाद घेणे हीच माझ्यासाठी मोठी समाधानाची गोष्ट आहे.”
या उपक्रमातून वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजातील गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत वाटण्याचा संदेश देण्यात आला.
