विशेष बातमी :३० ऑगस्ट २०२६
अवघ्या एका वर्षाचा चिमुकला हृदय अक्षय दरेकर सध्या एका अत्यंत गंभीर आणि दुर्मिळ आजाराशी लढा देत आहे. हृदयला SMA Type 1 (Spinal Muscular Atrophy) हा दुर्मिळ जनुकीय आजार झाला असून, यामुळे त्याच्या शरीराचे स्नायू हळूहळू कमकुवत होत आहेत. या चिमुकल्याचे प्राण वाचवण्यासाठी आणि त्याला सामान्य आयुष्य मिळवून देण्यासाठी एका महागड्या उपचाराची गरज आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक व
कार्यकर्ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) – अध्यक्ष (Chairman).
रविराज साबळे आणि दरेकर कुटुंबाने सर्वसामान्य जनतेला सढळ हाताने मदत करण्याचे भावुक आवाहन केले आहे.
काय आहे ‘SMA Type 1’ आणि उपचार?
SMA Type 1 हा अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक आजार मानला जातो. यावर ‘Zolgensma’ (झोलगेन्समा) हे एकमेव प्रभावी इंजेक्शन उपलब्ध आहे. परंतु, या जीवनदायी इंजेक्शनची किंमत तब्बल १० कोटी रुपये आहे. एका सामान्य कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे अत्यंत कठीण असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची नितांत गरज आहे.
छोटीशी मदत बदलू शकते संपूर्ण आयुष्य!
हृदयला नवीन आयुष्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तुमची एक छोटीशी मदत या चिमुकल्याचे प्राण वाचवू शकते.
हृदयच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवण्यासाठी आणि त्याला एक निरोगी आयुष्य मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आर्थिक मदत करावी, असे आवाहन रविराज साबळे यांनी पोलीस वारंट न्यूज नेटवर्कशी बोलताना केले आहे.
