सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सामाजिक ऐक्य जपण्याचे एक उत्तम उदाहरण जामखेडमध्ये पाहायला मिळत आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी) लिंगायत समाजाचे असूनही, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला सातत्याने पाठिंबा देणारे ‘मैत्री ग्रुप ‘चे संस्थापक/अध्यक्ष. सागर दादा गवसणे (मराठा) यांनी सामाजिक बंधुभाव आणि सलोख्याचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
“मी स्वतः लिंगायत समाजाचा आहे, परंतु जेव्हापासून मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा समाज आरक्षण व इतर न्यायाच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत, तेव्हापासून मी त्यांच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभागी असतो आणि यापुढेही कायम त्यांच्यासोबतच असणार,” असा ठाम आणि स्पष्ट विचार सागर गवसणे यांनी मांडला आहे.
जाती-पातीच्या संकुचित राजकारणाला छेद देत, सर्व समाजांनी एकमेकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी एकत्र आले पाहिजे, हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे सामाजिक सलोखा आणि बंधुता अधिक दृढ होण्यास मदत होत असून, परिसरातून त्यांच्या या विचारांचे मोठे कौतुक होत आहे.
मुंबईकडे आंदोलनासाठी जाणाऱ्या सर्व मराठा बांधवांचे आणि मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या इतर बांधवांचे जामखेड शहरात श्री. सागर दादा गवसणे (मराठा), स्व. अमोल भय्या गलधर युवा मंच तसेच सर्व कार्यकर्त्यांकडून सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. सामाजिक ऐक्याचा हा संदेश सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
