जामखेड:७सप्टेंबर २०२६
जामखेड येथील एसटी स्थानकावर एका प्रवाशाचे २५,३०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोपान चांगदेव कदम (वय ३४, व्यवसाय-मजुरी, रा. सध्या नायगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) हे ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास जामखेड एसटी स्थानकावर असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या जवळील ऐवज लांबवला.
चोरीस गेलेला माल:
सॅमसंग ए-७ मोबाईल
सोन्याचे कानातले
आधार कार्ड आणि पॅन कार्ड
(एकूण ६२,३००/२५,३०० रुपयांचा मुद्देमाल)
याप्रकरणी सोपान कदम यांच्या तक्रारीवरून जामखेड पोलिसांनी ६ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा नोंदवला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (अ) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार पोहेकॉ लोखंडे करत आहेत.
